25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home गुन्हेवार्ता तुमसरात जुगार अड्डय़ावर धाड, १५ जण ताब्यात

तुमसरात जुगार अड्डय़ावर धाड, १५ जण ताब्यात

0
419

तुमसर,दि.26ःकोरोना संसर्गामुळे जमावबंदी असताना जुगार खेळणार्‍या १५ जणांना तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ८६ हजार २७0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास तुमसर शहरातील शिवाजी वॉर्डात करण्यात आली.
शहरातील शिवाजी वॉर्डात मोठा जुगार सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांना मिळाली होती. त्यांनी ठाणेदार पिपरेवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्‍यांसह जुगार अड्डयावर धाड मारली. यात १५ जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. या कारवाईत नविन अग्रवाल, योगेश मुळे, राहूल वलुरकर, राकेश बोकळे, आरीफ सय्यद शेख, निखिल ठाकूर, सुधीर सिंग, संदीप फुले, सचिन गजानन मस्के, आकाश चव्हाण, ललित ठाकरे, संतोष लिल्हारे, सुमीत लोखंडे, जितून राणे, संजय हंसराज साठवणे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य असा २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.