24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता कपिल अन् धीरज वाधवान सीबीआयच्या कस्टडीत

कपिल अन् धीरज वाधवान सीबीआयच्या कस्टडीत

0
345

मुंबई,दि.26 – कोरोनाचे भयंकर संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई , खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि.  कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनमधून मुक्त केल्यानंतर आता सीबीआयने वाधवान यांना आज रविवारला ताब्यात घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्टिट करुन दिली. सीबीआयच्या पथकाने कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिसांनी वाधवान बंधुना कोरोनासंदर्भातील काळजी म्हणून आवश्यक ती साधनसामुग्री दिली आहे. त्यासोबत १+३ गार्ड अशी पोलीस यंत्रणा त्यांच्यासोबत असून मुंबईत पाठविण्यात आले आहे. त्यासोबत, लिखित स्वरुपात पत्रही देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. वाधवान यांच्यावर आयपीसी १८८, २६९, २७०, ३४ त्याच बरोबर आपत्कालिन व्यवस्थानच्या कलम ५१ बी तसेच कोविड १९ च्या कलम ११ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते.