24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता सीआरपीएफ जवानाची गोळी घालून आत्महत्या

सीआरपीएफ जवानाची गोळी घालून आत्महत्या

0
663

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यात तैनात केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आज दुपारी बंदुकीतून गोळी घालून आत्महत्या केली. दीपक कुमार(२७) असे मृत जवानाचे नाव असून, तो उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे.दीपककुमार हा केंद्रीय राखीव दलाच्या बटालियन क्रमांक ३७ मध्ये कार्यरत होता. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याने स्वत:कडील बंदुकीतून आपल्या छातीत गोळी घातली. मृत्युपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. घटनेनंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात येत आहे.

२२ एप्रिलच्या रात्री धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिस मदत केंद्रात चंद्रकांत शिंदे या राज्य राखीव दलाच्या पोलिस उपनिरीक्षकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेची शाई वाळण्याआधीच आज लाहेरीत एका जवानाने आपली जीवनयात्रा संपविली. मानसिक तणावामुळे पोलिस विभागात असे प्रकार अधूनमधून घडत असतात, याची प्रचिती अनेकदा आली आहे.