24.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ आमदार पटोले व मित्रपरिवाराकडून गरजुनां मदतीचा हात

आमदार पटोले व मित्रपरिवाराकडून गरजुनां मदतीचा हात

0
575

साकोली,दि.29 ःसाकोली तालुक्यातील वळद जि. प. क्षेञातील जनतेला मतदारसंघाचे आमदार व  विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले व मित्र परिवारांच्या माध्यमातून वळद जिल्हा परिषद क्षेञातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांसाठी जवळपास चार हजार किटचे वितरण करण्यात आले.महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी संपुर्ण साकोली विधानसभा क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंची किट बनवुन त्या गरजु पर्यंत उपलब्ध करून देत आहेत. वळद जिल्हा परिषद क्षेञातील शिवनीबांद,माहालगाव,सुकळी, वांगी ,गोडउमरी,निलज व इतर या येथुन सुरुवात करण्यात आली. साकोली तालुक्यातील एकट्या वळद जिल्हा परिषद क्षेत्रात सात हजार किट वाटुन सुरुवात केली आहे. त्यांच्या कडुन मिळत असलेली किट गरिबांना दिलासा देणारी ठरल्याने वळद जिल्हा परीषद क्षेञातील नागरीकांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त केला आहे.
सदर किटचे वितरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होमराज पाटील कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली दिपकभाऊ मेंढे जि.प स भंडारा हरगोविद भेडारकर लालचंद लोथे प. स.साकोली उमेश भेडांरकर नेपाल कापगते नंदु कावळे प्रकाश बागळे ,कामीनाताई भेंडारकर, अंजीरा चुटे,उमेश गहाने,कुदंना वाढई,रुपचंद बारसकर ,चरन मेक्षाम, व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.