गोंदिया,दि.29ः- करोना प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लाँकडाऊन असल्याने एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.मात्र 3 मे नंतर राज्यातील विविध जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांना त्यांच्या स्व जिल्ह्यात जाण्यासाठी लाॅकडाऊनमधून सवलत देण्यात यावी,अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याना निवेदनातून केली आहे.
संपूर्ण जगात कोरोना महामारी मुळे सर्वजन परेशान आहेत. त्यात भारताची परिस्तिथी पण काळजी करण्यासारखीच आहे. त्याचमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात 3मे पर्यंत lockdown आहे. प्रत्येक नागरीक मजूर आपल्या घरी जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोहचण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय. लाँकडाऊनमुळे ते आहे त्या जागेवर अडकून आहेत.आणि सरकार त्यांना सोडत पण नाही आहे. त्यामुळे नाईलाज म्हणून का होईना सर्व अडचण असताना पण अनेक नागरिक आहे त्या परिस्तिथीत दिवस काढत आहेत.ईतर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांची परिस्थीती यापेक्षा काही वेगळी नाही.पण सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी 1 मे पर्यंत आहे, त्या जिल्ह्यात सरकारने दिलेली कामे करत आहेत. पण अनेक शिक्षक दिवाळी सुटीनंतर उन्हाळी सुटी पर्यंत 5 महिने आपल्या मुख्यालयी राहुन कामे करतात. 1 मे नंतर सुरू होणारी उन्हाळी सुटी नंतर या कोरोना महामारी मुळे त्यांना आपल्या मुळ जिल्ह्यात घरी जाता येणार की नाही ही काळजी मनात चालू आहे.अनेक शिक्षकांना आपल्या वयस्कर आईवडील , भाऊ बहीण, मुले पत्नी यांना भेटण्यासाठी जीव कासावीस होत असल्याने 3 मे नंतर लाकडाऊन मधून सुट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
परंतु कोरोना परिस्तिथी पाहता 3 मे नंतर lockdown मधून जिल्हा बंदी प्रवास चालू होईल की नाही याची शास्वती स्पष्ट नसल्याने शिक्षक आपल्या घरी जायला भेटेल की नाही या संभ्रमात आहेत.तरी ईतर जिल्ह्यात कार्यरत प्राथमिक,माध्यमिक, जि.प.संस्थेतील, नपा.मनपातील सर्व शिक्षकांना आपल्या स्वजिल्ह्यात 3 मे नंतर जाण्य़ास परवानगी देण्यात यावे असे म्हटले आहे.




