गोरेगाव,दि.04 – संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना तालुक्यांमध्ये मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे शेवटी विभागाची बदनामी होऊ नये याकरीता पोलिस विभागाला कारवाई करावी लागली.गोरेगाव येथील येरोला देशी दारु दुकानातून अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळताच 3 मे रोजी सापळा रचून कारवाई केली.यावेळी अवैधरित्या दारू विक्री करतांना रामप्रसाद बागलकर यांच्याकडून २० पव्वे १०४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.तसेच किराणा दुकानदार प्रशांत राऊत याच्या किराणा दुकानात १० पव्वे १८० एलएल ५२० रुपये किमतीचे जप्त केले. कारवाईनंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात अवैध दारु विक्री प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक नारनवरे व उपनिरिक्षक देशमुख करीत आहेत.




