30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home शैक्षणिक जिल्हा समन्वयकांचा पुढाकार,दिव्यांग बालकांनाही मिळणार ऑनलाईन प्रवेश

जिल्हा समन्वयकांचा पुढाकार,दिव्यांग बालकांनाही मिळणार ऑनलाईन प्रवेश

शिक्षणापासून वंचित राहणार नाही. जिल्हा यंत्रणा सज्ज, इयत्ता पहिली त दाखल होणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी कृती आराखडा

0
322

गोंदिया,दि.५ः- कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांसह विद्यार्थ्यांचेही सरंक्षण व्हावे याकरीता शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.त्यातच राज्यात संचारबंदी असल्याने समुहाने फिरण्यावर बंदी घालण्यात आल्याने एैन शाळा प्रवेशाच्यावेळी शिक्षकांसह नव विद्यार्थी व पालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील दखलपात्र 118 दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,याकरीता जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा विभागांतर्गत ऑनलाईन प्रवेशाची सोय करण्यात आली आहे.या लॉकडाउनच्या काळात गोंदिया जिल्हा परिषदेने सत्र 2020-21 करिता इयत्ता पहिली मध्ये दखलपात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाची सोय उपलब्ध करुन दिल्याने दिव्यांग बालकांचे देखील इयत्ता पहिलीतील प्रवेशाचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापती यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेतील समग्र शिक्षा विभागातील कार्यरत कर्मचारी दररोज झूम अॅपच्या माध्यमातून दिव्यांग बालकांच्या प्रवेशाची प्रकिया पुर्ण करण्याच्या कार्याला लागले आहे.याकरीता जिल्हास्तराव जिल्हा समन्वयक कार्यरत असून सोबतीला प्रत्येक तालुकास्तरावर 2 तालुका समन्वयक,समावेशीत तज्ञ,जिल्ह्यात 43 विशेषतज्ञ शिक्षकांची चमू रात्रदिवंस यासाठी कार्य करीत आहे.त्याचप्रमाणे दररोज जिल्हा समन्वयकाकडून या ऑनलाईन प्रवेशाचा आढावाही घेतला जात आहे.सोबतच सोशल डिस्टसिंगचे पालन करीत पालकांनाही मुलाला दिव्यांग न समजता सर्वासारंखाच समजून घेण्याबद्दल समुपदेशन केले जात आहे. सामान्य मुलांप्रमाणेच दिव्यांग बालकांच्या प्रवेशाकरिता प्रभारी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,जिल्हा समनव्यक विजय ठोकणे, विलास मलवार व सर्व समग्र शिक्षा विभागातील यंत्रणा कार्यरत आहे.