28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ गोंदियात ४५ दिवसानंतर उघडली दारु दुकाने,तळीरामांची गर्दी

गोंदियात ४५ दिवसानंतर उघडली दारु दुकाने,तळीरामांची गर्दी

0
721

गोंदिया,दि.07 – केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे ग्रीन झोन असलेल्या गोंदियात आजपासून दारू विक्री सुरु करण्यात येत आहे.तब्ब्ल ४५ दिवसानंतर तळीरामांना आज दारू मिळत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दारू दुकान उघडणार म्हणून तळीरामांनी अक्षरशः सकाळपासूनच दुकानासमोर रांगा लावल्या होत्या.विशेष म्हणजे दारुखरेदीसाठी गर्दी मोठी असली तरी कुठेकुठे फिजिकल डिस्टंस(सोशल डिस्टसिंग)लोक पाळत असल्याचे तर काही ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचेही बघावयास मिळाले.blank

गोंदिया जिल्ह्यात मागील २८ दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून दारू विक्रीला परवानगी दिली आहे.ग्रीन झोन गोंदियात आजपासून मद्य विक्री सुरु करण्यात आली आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही दारू दुकाने सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करत दुकानदारांनी दुकानांसमोर ब‌ॅरिगेट लावले होते. तसेच दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला हात धुणे अनिवार्य करण्यात आले. त्यासोबत प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेस्टींग देखील करण्यात येत आहे.पोलिसांचा बंदोबस्त सुध्दा वाईनशाॅप समोर लावण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकार्यांचा नोंदवला निषेध

गोंदिया जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी बुद्ध जयंतीच्या पर्वावर मद्य विक्रीची परवानगी देऊन परंपरेला गालबोट लावले.तसेच बुध्दजयंतीच्या दिवशी दारु दुकान सुरु करण्याकरीता घेतलेला निर्णय हा सामाजिक भावनेला ठेच पोचविणारा असल्याच टिका बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक सुनिल भरणे यांनी म्हटले असून जिल्हाधिकारी यांच्या या निर्णय़ाचा निषेध नोंदविला आहे.सोबतच जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याने त्यांचे विचार पुर्वगृह्रदुषीत असल्याचे म्हटले आहे.सोबतच प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराचा वंचित बहुजन आघाडी व समता संग्राम परिषदेचे सतीश बनसोड, विनोदकुमार नंदुरकर, सिद्धार्थ हुमने, विनोद अभिमन्यु मेश्राम, एस डी महाजन, राजू राहुलकर, विनोद मेश्राम, किरणताई फुले, प्रकाश डोंगरे आदींनी निषेध नोंदवित संबधित अधिकार्यावर कारवाईची मागणी केली आहे.