तिरोडा,दि.07ः-येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांच्या बंद करण्या आलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात यावे याकरीता कपिल भोंडेकर यांनी पत्रव्यवहार केला होता.त्या पत्रव्यवहाराची दखल रुग्णालय प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने घेतली असून उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा प्रसुती शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे पत्र रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ.चंद्रशेखर पारधी यांनी दिले आहेत.तालुक्यातील महिलांना उपजिल्हा असतानाही कोरोना प्रार्दुभावाचे कारण सांगून प्रसुतीशस्त्रक्रिया टाळल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर भोंडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्र्यासह जिल्हा शल्यचिकीत्सकांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या निवेदनाची दखल घेत रुग्णालयातील बंद प्रसुतीक्रिया आज 7 मे पासून पुर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील सिजरीन प्रसूती बंद हे महाराष्ट्र शासनाचे ध्येयधोरनानुसार तात्पुरते स्वरूपाचे कोरोना विषानुचे प्रादुर्भाव रोखथांब करण्यासाठी करण्यात आले होते.तिरोडा उपजिल्हा रुग्णालय हे सामान्य जनतेच्या दृष्टीने कटिबद्ध असून आज गुरुवार पासून सिजरिंग पूर्ववत होत असल्याचे डॉ.चंद्रशेखर पारधी अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तिरोडा यांनी म्हटले आहे.





