28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रकच्या धडकेत वेकोली कर्मचारी ठार

ट्रकच्या धडकेत वेकोली कर्मचारी ठार

0
372

यवतमाळ,दि.07: वणी मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत वेकोलि कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. संतोषकुमार गरीबदास (४०) असे मृताचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथील रहिवासी आहे. तो भादेवाडा येथील कोळसा खाणीत कार्यरत होता. सकाळी कामावर जात असताना ही घटना घडली. त्यावेळी त्याचा मुलगा प्रमोदकुमार हा दुचाकी चालवत होता. संतोषकुमार मागच्या सीटवर बसलेला होता.