28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता देशी कट्ट्याच्या धाकावर धाडसी चोरी करणारे दोघे गजाआड

देशी कट्ट्याच्या धाकावर धाडसी चोरी करणारे दोघे गजाआड

0
276

आमगाव,दि.09ः देशी कट्ट्याच्या तसेच चावूâचा धाक दाखवून चोरी करणारे २ आरोपी पोलिसांनी गजाआड केल्याची घटना ६ मे रोजी आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत बनगाव येथे उघडकीस आली.सविस्तर असे की, बनगाव येथे फिर्यादी भवन गिरी यांच्याघरी २ पेâब्रुवारी रोजी एका इसमाने बंदुकीच्या धाकावर चोरी करून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.
तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केले होते. दरम्यान आरोपी बाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता, मो. अख्तर इकबाल मोगल रा. बनगाव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्ह्या केल्याचे कबुल केले. तसेच मो.मोगल याने या कामी दुसरा आरोपी असल्याचेही सांगितले. दरम्यान मो. मोगल याने विनम्र उर्पâ नितीश
जगदीश भडके याच्यासह कट रचून तो गुन्हा केल्याचेही सांगितले. विनम्र बाबत विचारपुस केली असता, तो देवरी
येथे राहत असल्याचे सांगितले. देवरी येथील पंचशील चौकात पोलिसांना तो मिळून आला. त्यावेळी पोलिस त्याला ताब्यात घेत असतांना त्याने गावठी कट्ट्याने पोलिसांवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पळून जात असतांना
पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी त्याच्याकडे देशी कट्ट्यासह २ जीवंत कारतुसही मिळून आले. दोन्ही आरोपींना ताब्यात
घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात
आली आहे. चौकशीत त्यांच्याकडून चोरीचे ८० ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक
तथा उपविभागीय पोलिस अधीकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शामराव काळे, सपोनि. संतोष
जाधव, पो.हवा. रामेश्वर बर्वे, आनंद भांडारकर, युवराज सव्वालाखे, खुशाल पेंदाम, अरुण उके, अंसार कुरैशी, सुरेंद्र
लांजेवार आदींनी पार पाडली.