भंडारा दि. 11 :– जम्मू काश्मीर तसेच लदाख येथील लॉकडाउनमुळे भंडारा व परिसरात अडकलेल्या नागरिकांसाठी गुरुवार दिनांक 14 मे रोजी दुपारी दोन वाजता जम्मु साठी श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार आहे, या विशेष रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांनी आपली नावे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
जम्मू साठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे साठी नागरिकांनी आपली नावे जिल्हाधिकारी यांच्या ई मेल वर rdcbhandara4@gmail. com यावर 12 मे 2020 सायंकाळी 8 वाजता पर्यंत नोंदविता येतील. ऑन लाईन नाव नोंदविताना संपूर्ण नाव, लिंग, वय, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, सद्याचा पत्ता, जेथे जात आहे तेथील पत्ता आदी माहिती सादर करणे आवशयक आहे. जम्मू विशेष रेल्वे साठी जिल्हाधिकारी, भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अथवा नियंत्रण कक्ष क्रमांक 07184 251222 यावर सुध्दा संपर्क साधता येईल.




