गोंदिया,दि.11ः देशात कोरोना बांधीतांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी विविध माध्यमातून आवाहन केले आहे.तर सर्वच कार्यक्रमात व बैठकामध्ये फिजकल डिस्टंस(सोशल डिस्टसिंग) पाळण्याचे निर्देश दिले असून सध्याच्या घडीला तो नियम आपत्तीनिवारण विभागाने केला आहे.मात्र या नियमांचे उल्लघंनच राज्याचे मंत्री व लोकप्रतिनिधी सर्रासपणे करतांना दिसून आले.आज सोमवारला(दि.11)राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनिल केदार हे गेल्या पाच महिन्यापासून बंद पडलेल्या गोंदियातील दुधसंकनल केंद्राच्या पुनःशुभारंभ कार्यक्रमासाठी आले होते.यादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल,मनोहरराव चंद्रिकापुरे व सहसराम कोरेटे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मात्र या शुभारंभ कार्यक्रमात फिजिकल डिस्टंसला (सोशल डिस्टसिंग) डावलत मंत्री व आमदारांनी भेटीगाठी कार्यक्रम व अधिकार्यांशी संवाद साधल्याचे चित्र दुध संकलन केंद्रात बघावयास मिळाले.यावरुन सर्वसामान्य नागरिकांना फिजिकल डिस्टसं पाळण्याचे आवाहन करणारे शासनाचे प्रतिनिधी व जनतेच्या प्रतिनिधीनींच मात्र यास हरताळ फासल्याचे चित्र समोर आले.तर या कार्यक्रमासाठी 100 च्यावर लोकांची उपस्थिती होती.जेव्हा कार्यक्रमात गर्दी करता येत नाही.अंत्ययात्रेत 20 च्यावर लोक राहू शकत नाही मग या कार्यक्रमाला शेक़डोची उपस्थिती कशी अशाही प्रश्न उपस्थित झाला आहे.या कार्यक्रमाला दुग्धविकास विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.पण, एकाही अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टसिंग पाळले नाही. कोरोना संसर्गचा प्रभाव कमी करण्यासाठी किमान सहा फूट अंतर दोन व्यक्तीत हवे, असे अधिकारी नियमित सांगतात. पण,शासनाचे प्रतिनिधी असलेले मंत्री व आमदारांसह प्रशासनाला त्याचा विसर पडल्याचे यातून स्पष्ट झाले.




