26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home शैक्षणिक ऑनलाईन शिक्षण ३० टक्क्यांसाठी ७० टक्के विद्यार्थ्यांचे काय?

ऑनलाईन शिक्षण ३० टक्क्यांसाठी ७० टक्के विद्यार्थ्यांचे काय?

प्रकाश ब्राम्हाणकर यांचा सवाल

0
140

गोंदिया,दि.12 : संपूर्ण जगावर कोरोनाने थैमान घातला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी पालक शिक्षक संकटात आले आहेत. कोरोनाचे संकट कधी संपते याची सर्वजण वाट बघत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर देशातील शिक्षणाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय म्हणून समोर येत आहे. ऑनलाईन शिक्षणाला भरपूर मयार्दा आहेत. ऑनलाईन शिक्षण केवळ ३० टक्केच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकेल. उर्वरीत ७० टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यांनी शिकायचे नाही का? असा सवाल शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर यांनी केला आहे. कोरोना होऊ नये अशी काळजी घ्यायला हवी, लॉकडाऊन नंतरही सर्वांना या आजाराशी सामना करायचा आहे. त्याची तयारी आपण करायला हवी. जसे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर देशातील शिक्षणाचे काय होणार ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय म्हणून समोर येत आहे. ऑनलाईन शिक्षणाला भरपूर मर्यादा आहेत. ऑनलाईन शिक्षण केवळ ३० टक्केच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. उर्वरीत ७० टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यांनी शिकायचे नाही का? राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षणाबाबत नुकतेच परिपत्रक काढले आहे. दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड करून हे शिक्षण घ्यायचे आहे. यात विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचे आहे, विद्यार्थी केवळ श्रोते असतात. दीक्षा अ‍ॅप देऊन शिक्षण विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. उरलेल्या ७० टक्के विद्यार्थ्यांचा विचार कोण करणार? दहावीपर्यंतच्या कोणत्याच विद्यार्थ्यांकडे स्वत:चा मोबाईल नाही अशा काळात आई-वडिलांचा मोबाईल विद्यार्थ्यांना वापरावा लागेल. मोबाईल ही वैयक्तीक व गरजेची गोष्ट झाली आहे. त्यामुळे किती पालक विद्यार्थ्यांच्या हातात अ‍ॅड्रॉईड मोबाईल देतील हा प्रश्नत अनुत्तरीत आहे. यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे बरेच प्रश्नस अनुत्तरीत आहेत. शिक्षण विभाग निर्णय घ्यायला तयार नाही. दहावीचे निकाल कसे आणि कधी लागणार दहावीच्या पेपर तपासणीचे काय करायचे, पहिली ते अकरावीचा निकाल कसे तयार करायचा. काही शाळांनी तर मे महिन्याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना दिले आहे. शिक्षण नको पण ऑनलाईन आवरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. ऑनलाईनवर अतिशय सुमार दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षक १०० टक्के टेक्नालॉजीसह असल्याच्या अविभार्वात हे सर्व काम चालू आहे. मोबाईलमुळे मुलांचे डोळे दुखणे, डोके दुखणे, मान दुखणे यासारखे आजार बळावलेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसमावेशक होऊ शकत नाही. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.