24.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता हट्टा ठाणेतंर्गत पोलीस नक्षल चकमकीत एक पोलिस जखमी

हट्टा ठाणेतंर्गत पोलीस नक्षल चकमकीत एक पोलिस जखमी

0
493

गोदिया,दि.16-शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यांतर्गत येत असलेल्या हट्टा पोलीस ठाणेंतर्गतच्या गोदरी चौकीतील हार्सफोर्सचे जवान शुक्रवारला सकाळी सर्चिंग करीता जंगलात गेले असता सर्चिंग दरम्यान भानपुर-ठाकुरटोला जंगलात घात लावून बसलेल्या नक्सल्यांनी पोलीस पार्टीवर हमला केला. यात हार्सफोर्सचे प्रधान आरक्षक लोकेन्द्र सिंह यांना या फायरींगमध्ये गोळी लागल्याने त्यांना गोंदियाच्या सेंट्रल हाॅस्पीटलला भरती करण्यात आले.दरम्यान घनदाट जंगलाचा लाभ घेत नक्षली फरार झाले असून बालाघाट पोलीस अधिक्षक अभिषेक तिवारी यांना मलाजखंड दलम या परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती,त्यानुसार सर्चिंगकरीता पोलिस पार्टी रवाना झाली होती.मात्र नक्षल्यांनी अचानक गोळीबार केले,त्या गोळीबाराला प्रत्युतरादाखल पोलिसांनीही गोळीबार केल्याचे सांगितले.जखमी पोलिसाची प्रकृती स्थिर असून उपपोलिस महानिरिक्षक केपी व्यंक्टेश्वर राव यांनी जखमी पोलिसाची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे.