24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ नागझिरा – नवेगाव काॅरीडोर मधे गव्याचा मृत्यू

नागझिरा – नवेगाव काॅरीडोर मधे गव्याचा मृत्यू

0
661

गोंदिया,दि.१६-उन्हाळा आला की नेहमी तापमान वाढल्यानंतर काॅरीडोर/बफर भागातील गव्याच्यां मृत्यूच्या घटनांना सुरूवात होते.असेच नागझिरा नवेगााव काॅरीडार असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा – सालयीटोला लगतच्या परिसरात 15 मे रोजी एका वयस्क गव्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.सविस्तर असे की शेंडा-सायलीटोला भागात एक गवा एकाच ठिकाणी बसून असून अशक्त वाटत असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी “सेवा” संस्थेच्या टीमला दिली.त्या संस्थेच्या सदस्यांनी माहिती मिळताच संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती दिली.त्यानंतर वन कर्मचारी व वन्यप्रेमी कार्यकर्ते सबंधित जागेवर पोचून पाहणी केली तेव्हा त्या गव्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.गेल्या दोन दिवसापासून एकाच ठिकाणी बसून होता याची माहिती स्थानिक कर्मचार्याना असतांनाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गव्याला प्राण गमावावे लागले.जर वेळेतच उपचार मिळाले असते तर कदाचित गव्याचे प्राण वाचले असते असे वन्यप्रेमींचे म्हणने आहे.
नेमके तापमान वाढल्यावर एप्रिल- मे महिन्यादरम्यान अशा घटना होतांना गेल्या काही वर्षापासून सातत्याने दिसून येतात.त्याचे मुख्य कारण उष्मघाताने (सन स्ट्रोक) असे आमच्या निदर्शनास आले आहे. गव्यांना वेळेवर त्यांच्या हद्दीतील क्षेत्रात पाणी पाहिजे असते.बफर भागात पाण्याचे स्रोत लिमीटेड असल्याने व बायोटिक प्रेशर अधिक असल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी भरपूर पायपीट करावी लागत असल्याची माहिती वन्यप्रेमी सावन बहेकार यांनी दिली.जांभळी भागातील जंगलामध्ये अवैध चराई, एफडीसीएमची कटाई, तेंदुपानतोडाई , जंगलातील वनवा असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे वन्यजीवांचे हाल होत आहेत.