41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा करणार्या राईस मिलर्सला अटक करा

निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा करणार्या राईस मिलर्सला अटक करा

0
661

blank

गोंदिया,दि.16ःगोंदिया जिल्हयात धानाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते.त्या धानाची खरेदी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फेत केल्यानंतर सदरचा धान राईसमिलर्सला मिलिंगकरिता देऊन शासन तो तांदूळ खरेदी करतो.त्या तांदळाची गुणवत्ता सुध्दा असायला हवे असे नियम आहे.मात्र गोंदिया जिल्ह्यातील राईसमिलर्स असो.च्या एका वरिष्ट पदाधिकारी असलेल्याच्या राईस मिल मधून गुणवत्ता नसलेला तांदुळ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील गोदामात करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे.सीएमआर अंतर्गत निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा करता येत नाही,परंतु राजकीय दबाव व लाॅबीचा वापर करुन नेहमीच असे केले जाते,त्यानुसार आज सुध्दा असाच प्रकार घडला.मात्र स्थानिक पुरवठा अधिकारी यांनी तो निकृष्ठ दर्जाचा माल स्विकारण्यास नकार देत पंचनामा तयार करायला सुरवात केली आहे.दरम्यान आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी सदर मिलमालक लागेबांधे वापरायला सुरवात केल्याचे वृत्त आहे.नागरिकांनी तसेच अनेक सामाजिक संघटनानी निकृष्ठ तांदुळ पुरवठा करणार्या मिलमालकावर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे,त्याचप्रमाणे सदर राईस मिलला काळ्या यादीत प्रशासनाने टाकावे अशी मागणी केली आहे.दरम्यान अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांना विचारणा केल्यावर निकृष्ठ तांदळाचा पुरवठा झाल्याची तक्रार असून त्याप्रकरणात नवेगावबांध येथे पुरवठा विभागाचे कर्मचारी कारवाई करीत आहेत,अहवाल आल्यानंतरच सत्य काय आहे कळणार असे सांगितले.

blank