आमगाव,दि.16ः- पोलीस ठाणेतंर्गत येणार्या फुक्कीमेठा गावातील एका विहीरीत 20 वर्षीय बेपत्ता युवकाचे मृतदेह आढळून आल्याने त्या युवकाची आत्महत्या की हत्या अशा चर्चांना उधाण आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 मे रोजी फुक्कीमेठा येथील डिलेश्वर श्रावण मेश्राम (वय 20) हा युवक घरुन बेपत्ता झालेला होता.त्याचा शोध घेण्यात आला परंतु कुठेच आढळून न आल्याने 15 मे रोजी पोलिसात तक्रार नोंदवली.आज 16 मे रोजी सकाळच्या सुमारास शेतातील एका खोदकाम सुरु असलेल्या विहिरीत बेपत्ता युवकाचे मृतदेह तरंगताना आढळून आले.ज्या विहीरीत युवकाचे मृतदेह आढळले ती विहीर 12 ते 14 फुट खोल असून 5 ते 6 फुट पाणी असून त्या विहिरीचे बांधकाम सध्या सुरु आहे.या विहीरीत युवकाचे मृतदेह आढळल्याने शंका कुशंकाना उधाण आले आहे.पोलिसांनी घटनास्थळावर पोचून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून उत्तरीय तपासणीनंतरच युवकाची हत्या की आत्महत्या हे कळणार आहे.पुढील तपास ठाणेदार श्याम काळे यांच्या मार्गदर्शनात दिलीप कुरसुंगे करीत आहेत.




