25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थीस्नेही केंद्रप्रमुख व शिक्षकांची विद्यार्थी पालकांसोबत संवाद

विद्यार्थीस्नेही केंद्रप्रमुख व शिक्षकांची विद्यार्थी पालकांसोबत संवाद

0
209

तुमसर,दि.21ः पंचायत समितीतंर्गत येणार्या सिहोरा केंद्राचे कर्तव्यदक्ष विद्यार्थीस्नेही केंद्रप्रमुख टी.ए.कटनकार व उपक्रमशील शिक्षक दामोदर डहाळे यांनी करोनासंसर्गामुळे शाळा बंद पडल्याने जिल्हा परिषद शाळा मांडवीच्या विद्यार्थी व पालकासोंबत फिजिकल डिस्टंशींगच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून भेट घेत,त्यांच्याशी सुसंवाद साधला.
या भेटीत ‘दिक्षा अॅप’ चा वापर,शालेय शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासनाची ‘शाळा बंद..पण शिक्षण सुरु’ ही दैनंदिन अभ्यासमाला तसेच प्रथम शिक्षण फाऊंडेशन,विभागीय आयुक्त संजीव कुमार व आकाशवाणी नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘शाळे बाहेरची शाळा’ या सर्व उपक्रमांविषयी श्री.कटनकार यांनी विद्यार्थी व पालकांना माहिती दिली.तसेच लॉकआऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने पूर्ण केलेल्या रोजच्या Activities च्या लेखी नोंदी वहित नोंदविल्याचे बघून समाधान व्यक्त करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दामोधर डहाळे यांनी विद्यार्थी व पालकांना विविध Online links कशा Open कराव्यात,DIKSHA App व Zoom Cloud App यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावा,विद्यार्थ्यांनी किती वेळ Online राहून मोबाईल वापरावा,मोबाईल हाताळतांनी काय काळजी घ्यावी तसेच दैनंदिन Activities च्या नोंदी लेखी स्वरूपात कशा व्यवस्थित घ्याव्यात अशा विविध तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले.तसेच करोना विषाणूची लागण होवू नये,यापासून बचाव कसा करावा याचे मार्गदर्शनसुद्धा विद्यार्थी व पालकांना केले.या स्नेहभेटीत तनश्री रविंद्रकुमार सरोदे (इ.४थी),रुणाल रविंद्रकुमार सरोदे(इ.6वी),अंशुल दुर्वास टांगले(इ.5वी),अर्पिता राजेश मते (इ.5वी),वेदिका भारत ढबाले(इ.6वी ),राणु कैलास मते (इ.6वी) या विद्यार्थी व पालकांची भेट घेण्यात आली.अशाप्रकारे कर्तव्यदक्ष,विद्यार्थीस्नेही केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्या भेटीने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या बऱ्याच शंकांचे समाधान होवून त्यांना भावनिक व मानसिक आधार मिळून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसून आले.