
गोरेगाव,दि.01ः वैश्विक महामारीत रूपांतर झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाने जगासह देशात थैमान घातला आहे. राज्य व जिल्हाही विषाणू संसर्गाने प्रभावित झाला असून बाधितांचा आकडा दररोज फुगत आहे. खबरदारी व नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली असून कोरोनाशी लढा देणारे लढवय्येसुध्दा याला अपवाद नाही. पण लढाई सोडून पळ काढणे आमच्या रक्तात नाही, हे दाखवून देण्यासाठी सुरक्षित राहून शासन, प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, असा मार्मिक सल्ला आ.विजय रहांगडाले यांनी दिला.
पंचायत समितीच्या सभागृहात २९ मे रोजी कोरोनाच्या लढवय्या योध्दांच्या सभेत मार्गदर्शन करताना आ.रहांगडाले बोलत होते. यावेळी गोरेगाव नगरात २८ मे रोजी निघालेल्या पॉझिटिव्ह रुगणामुळे नगरात दहशत वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष आशिष बारेवार, मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी तातडीने जुनी वस्ती परीसर सगळीकडून सिल केला. व नगरात दवंडी देऊन गावकर्यांना सतर्कतेचा इशारा दिला. या कायार्साठी आमदार रहांगडाले यांनी सर्वांचे कौतुकही केले. अशीच दक्षता घेण्यासाठी व रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी कार्यतत्पर रहावे असा सल्ला दिला. यावेळी नगराध्यक्ष आशिष बारेवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, महामंत्री संजय बारेवार, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र भड, ऋषिपाल टेंभरे, प्रभारी तहसीलदार वाकचौरे, खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, पो.नि.सुरेश नारनवरे, मुख्याधिकारी हर्षला राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी चुलपार, गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, कृषी अधिकारी मोरे, वनाधिकारी साठवने, प्रशासकीय अधिकारी कांबळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन कोरोनाशी लढण्यासाठी सुरक्षितता बाळगून कर्तव्यदक्ष राहण्याबाबत सांगितले. यात कोरोनाच्या सर्व केंद्रात आवश्यक ती दक्षता घेऊन बाधितांना सुरक्षित ठेवणे, जिवनावश्यक वस्तूची पुरेशी सोय तातडीने करणे, शहरातून गावात येणार्या मजूराची योग्य नोंद घेऊन त्यांना गावात कोरोनटाईन केंद्रात ठेवण्यापेक्षा गोरेगावातील केंद्रातच ठेवावे. हा महत्वपूर्ण सल्ला दिला. अशा व्यक्ती गावात शहरात फिरणार नाही याची दक्षता घेऊन कर्मचारी, अधिकारी यांनी कार्यतत्पर राहणे गरजेचे आहे. सर्व जनतेला कोरोनाची बाधा टाळण्यासाठी फिजिकल डिस्टिन्स पाळा, मास्क वापर करा, घरीच राहा, सुरक्षित राहा असा सल्लाही देण्यात आला.





