25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज आठ तर गोंदियात सहा रुग्णांना सुट्टी

भंडारा जिल्ह्यात आज आठ तर गोंदियात सहा रुग्णांना सुट्टी

0
983

भंडारा/गोंदिया/  दि. (जिमाका)ः    जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यात आज 8 रुग्ण व गोंदिया जिल्ह्यात 6 कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची संख्या 9 झाली आहे.गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आज कोरोनामुक्त झालेले सर्व सहा रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे.आज दोन्ही जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.भंडारा जिल्ह्यात क्रियाशील रुग्णांची संख्या 22 तर गोंदिया जिल्ह्यात  कोरोना क्रियाशील रुग्ण २३ आहेत.भंडारा जिल्हयात एकूण बाधित संख्या 31 व गोंदिया जिल्ह्यात ६७ कोरोना बधित रुग्ण संख्या आहे.

ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 1901 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने  नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले  आहे.त्यापैकी 31 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 1751 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 126 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.आज 1 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 33 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 316 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नर्सिंग होस्टल भंडारा क्वारंटाईन मध्ये 14 व्यक्ती भरती आहेत. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 425 असे एकूण 439 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये भरती आहेत. 1169 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.पुणे, मुंबई व इतर राज्यातून 39457 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 26717 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 12740 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पहिल्या बाधित रुग्णाला १० एप्रिल रोजी, दोन रुग्णांना २८ मे रोजी, २५ रुग्णांना २९ मे रोजी. चार रुग्णांना ३० मे रोजी, ३१ मे रोजी ६ रुग्णांना आणि आज १ जून रोजी आणखी सहा रुग्णांना सुट्टी देण्यात आल्यामुळे आतापर्यंत ४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यातील जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्या सर्व रुग्णांचे सुट्टी देण्यापूर्वी समुपदेशन करण्यात आले. सर्वांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.

जे कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले त्यामध्ये २६ मार्च(१ रुग्ण), १९ मे (२ रुग्ण) ,२१ मे(२७ रुग्ण) २२ मे(१० रुग्ण),  २४ मे ( ४ रुग्ण), २५ मे( ४ रुग्ण ), २६ मे (१ रुग्ण), २७ मे (१ रुग्ण),२८ मे (९ रुग्ण), २९ मे(३ रुग्ण), ३० मे (४ रुग्ण ),३१ मे (१ रुग्ण)असे एकूण ६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

एकूण ९९७ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने आतापर्यंत नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ६७ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ४७ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.ग्रामस्तरावरील विविध शाळा व संस्थांमध्ये ३९६४ व्यक्ती आणि गृह अलगीकरणात ३०२७ व्यक्ती आहेत.अशा एकूण ६९९१ व्यक्ती अलगीकरणामध्ये आहे.