गोंदियाः दि.१ – भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आज १ जून २०२० पासून गैर श्रमिक नियमित रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येत असलेल्या गोंदिया रेल्वेस्थानकावरुन आज अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच गाडी क्रमांक ०२०७० गोंदिया – रायगड जन्मशताब्दी एक्सप्रेस दुपारी 3 वाजता गोंदिया येथून 115 प्रवाशी घेऊन रवाना करण्यात आली.त्या गाडी क्रमांक ०२०६९ रायगड – गोंदिया जन्मशताब्दी एक्सप्रेस गोंदिया स्थानकावर 1.50 वाजता 66 प्रवाशी घेऊन दाखल झाली.
ज्या प्रवाशांचे ई-तिकिट निश्चित झाले त्यांनाच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश देण्यात आले. त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या 90 मिनिटापुर्वी रेल्वे स्टेशनवर हजेरी लावत थर्मल स्क्रीनिंगसह कोविड -१९ अंतर्गत पुर्ण तपासणी करुन घेतली.त्या तपासणीनंतर सर्व 115 प्रवाशांना फिजिकल डिस्टंसिंग ठेवत डब्यामध्ये बसविण्यात आले.





