अर्जुनी मोरगाव,दि.03 : अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरणा विषाणूच्या वाढता प्रभाव लक्षात घेता, तालुक्यातील एग्रीकीग शेतकरी उत्पादन कंपनी नवेगावबांध द्वारा प्रत्येक गावांमध्ये शेतकर्याच्या घरापर्यंत बियाणे व खते विक्रीचा अभियान सिरेगावबांध येथे सुरू करण्यात आलेला आहे.
सदर अभियानाची सुरुवात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक लोकपाल गहाणे, सरपंच दादा संग्रामे, गावातील शेतकरी उपस्थित होते.





