गडचिरोली,दि.04ः – रानडुकराची शिकार करून मांसांची विल्हेटवाट लावणार्या अनखोडा येथील चार आरोपींना मार्कंडाचे क्षेत्रसहायक व कर्मचार्यांनी १ जून रोजी अटक केली. परशुमराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगण उद्धव निमसरकार, सागार अवथरे सर्व रा. अनखोडा असे आरोपींची नावे आहेत.
अनखोडा येथे रानडुकराची शिकार केल्याची गुप्त माहिती मार्कंडा (कं.) क्षेत्रसहायक एम. जी. गोवर्धन यांना मिळाली. त्यांनी कर्मचार्यांसह आरोपी परशुमरा मडावी यांच्या घरी जावून घर परिसराची तपासणी केली असताना आरोपी मोक्यावर रानडुकराचे मांस कापत असल्याचे आढळून आला. त्याची विचारपूस केली असता राडनुकराचे मांस असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अंदाजे २ किलो मांस, १ कुन्हाड, १ विळा असे साहित्य जप्त केली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली. चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. ए. पवार यांनी तत्काळ येऊन विचार पूस केला असता त्यांनी सहभागी आरोपी विनोद ठाकरू, गगण निमसरकार, सागार अवथरे असे सांगितले. या सर्वंना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्या वनगुन्हा क्रमांक २0२/१0 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आपल्लापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी एन. ए. गेडाम यांच्या मार्गदर्शनात चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवार, मार्कंडाचे क्षेत्रसहायक एम. जी. गोवर्धन, ठाकरीचे क्षेत्रसहायक ए.एम. पोतगंटावार, आष्टीचे वनरक्षक जे.पी. गोवर्धन, इल्लुरचे सोनवणे, मार्कंडाचे ए.एस. कुमोटी, विश्वनाथ मंथनवार हे करीत आहेत. चारही आरोपींना चामोर्शी न्यायालयात दाखल करण्यात असता न्यायालयाने जामीनावर सुटका करण्यात आली.





