24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ बंधपत्रित परिचारिका करणार आज केटीएस रुग्णालयात आंदोलन

बंधपत्रित परिचारिका करणार आज केटीएस रुग्णालयात आंदोलन

0
539

गोंदिया,दि.08 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत 20-25 बंधपत्रित परिचारीकांनी स्थायी करण्याच्या मागणीला घेऊन आज(दि.08)जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.शासनाने बंधपत्रित परिचारिकांना सामावून घेतांना भेदभाव पुर्ण प्रणाली अवलंबिल्याचा आरोप यांचा आहे.19 एप्रिल 2015 पर्यंतच्या सर्व बंधपत्रित परिचारिकांना स्थायी करण्यात आले,मात्र 5 मे 2015 रोजी लागलेल्या बंधपत्रित परिचारिकांना वगळून शासन अन्याय करीत असल्याचे या परिचारिकांचे म्हणने आहे.या दोन्ही रुग्णालयात कार्यरत ६० परिचारिकांपैकी 25 च्याजवळपास बंधपत्रित परिचारिका या 5 मे 2015 च्या काळात लागलेल्या असून त्यांना अद्यापही शासन सेवेस स्थायी करण्यात आलेले नाही.जेव्हा स्थायी परिचारिकांसारखेच काम या सुध्दा करत आहेत.