24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ आ.चंद्रिकापुरेंना मागण्यांचे राष्ट्रवादी किसान सभेने दिले निवेदन

आ.चंद्रिकापुरेंना मागण्यांचे राष्ट्रवादी किसान सभेने दिले निवेदन

0
526

सडक अर्जुनी,दि.08ः राष्ट्रवादी किसान सभेच्यावतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन सादर करीत शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार युवकांच्या समस्या अवगत करुन देण्यात आले.कोवीड-19च्या पार्श्वभूमीवर अनेक समस्या निर्माण झाल्याने या सर्वांना आर्थिक सहकार्य करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.सोबतच विजेचेे बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.                            निवेदनात कोविड 19 या महामारीने शेतकरी, कामगार, बेरोजगार, शेतमजूर हा बेरोजगार झाला असून आर्थिक अडचणीत आहे.महाराष्ट्र शासनाने धान पिकाचे उत्पादनावर सन 2019-20 वर्षासाठी प्रतिक्विंटल 700/-रुपये बोनस जाहीर केले.परंतु बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकरी वर्गाला बियाणे,खते खरेदी करणे अशक्य झाल्याने बोनसची रक्कम लवकर मिळून देण्याची विंनती करण्यात आली.सोबतच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50000/-रुपयाचे मर्यादेतील प्रोत्साहन पर रक्कम शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचेही निवेदनात राष्ट्रवादी किसान सभेने म्हटले आहे.
शेतातील विद्युत पंपाचे वीज बिल माफ करणे,घरकुल योजनेतील अनु.जातीच्या लोकांना “”रमाई””योजने अंतर्गत लाभार्थ्याना घरकुलाची प्रलंबित रक्कम देण्यात यावी.आदिवासी खरेदी विक्री संस्थेद्वारे करीत असलेल्या धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करून देणे किंवा जे शेतकरी स्वतःचा बारदाना देतात त्यांना त्याची रक्कम किंवा बारदाना परत देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी निवेदन सादर करतांना माजी जि.प.उपाध्यक्ष छायाताई चव्हाण,राष्ट्रवादी किसान सभेचे एफ.आर.टी.शहा,अनिल राजगिरे,भूमेश्वर चव्हाण,फारूक शेख,सुबूर शेख,अंकुश गजभिये,आतिक शेख उपस्थित होते.