24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता घोरपडचे मांस शिजवणारा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

घोरपडचे मांस शिजवणारा आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

0
879
गोरेगाव,दि.08ः-गोरेगाव वनविभागातंर्गत येत असलेल्या लेंडेझरी येथे 6 जून रोजी करण्यात आलेल्या छापामार कारवाईत एका व्यक्तीच्या घरातून घोरपडीचे शिजवलेले मास हस्तगत करण्यात आले होते.त्या प्रकरणातील आरोपीला 7 जून रोजी तालुक्यातील कृर्हाडी येथून अटक करण्यात आली आहे.
लेंडेझरी येथील रहिवासी राजू ऊंदरु लामकासे या इसमाने घोरपडची शिकार करुन मांस शिजवल्याची माहिती गोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल.साठवने यांना गुप्तहेराकंडून मिळताच क्षेत्र सहाय्यक कोहाट, वनरक्षक एसबी फलरे व वनमज़ुरांसोबत घेत 6 जून च्या सायकांळी 6 वाजेच्या सुमारास राजू लामकासेच्या घरावर छापामार कार्रवाई केली.
या कारवाईत घोरपडचे शिजवलेले मटन मिळाले मात्र आरोपी फऱार झालेला होता. दुसर्या दिवशी 7 जूनला वनविभागाच्या चमूने आरोपीला कुर्हाडी या गावातून अटक करुन वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.