24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ भारतीय स्टेट बैंक गोरेगांव शाखेचे उद्घाटन

भारतीय स्टेट बैंक गोरेगांव शाखेचे उद्घाटन

0
311

गोरेगाव,दि.09ः गेल्या अनेक वर्षापासून तालुका मुख्यालय असलेल्या गोरेगाव येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा सुरु व्हावी यासाठी जनता मागणी करीत होती.या मागणीला धरुन नगराध्यक्ष आशिष बारेवार व उपाध्यक्ष सुरेश रहागंडाले यांनी आमदार विजय रहागंडाले तसेच तत्कालीन पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांच्याकडे पाठपुरावा करीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय पोचविला.त्यानंतर गोंरेगाव येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या.विशेष म्हणजे गोरेगाव करीता मंजुर असलेली एसबीआयची शाखा ही गोंदिया तालुक्यातील कारंजा पोलीस मुख्यालय परिसरात कार्यान्वित करण्यात आलेली होती.आता गोरेगाव येथे ही शाखा सुरु झाल्याने तालुक्यातील 80 गावांसह शासकीय कार्यालयाना त्याचा लाभ मिळणार आहे.या बँके शाखेचे उदघाटन एसबीआयचे सीआरएस राध्येशाम प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष आशीष बारेवार, उपाध्यक्ष सुरेश राहंगडाले, श्री गजभिये शाखा प्रबंधक एसबीआई, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक रेखलाल टेभंरे,गटविकास अधिकारी झामसिंह टेंभरे, नप मुख्याधिकारी हर्षला राणे,पोलीस निरिक्षक सुरेश नारनवरे उपस्थित होते.विशेष म्हणजे न.प.उपाध्यक्ष रहागंडाले यांच्या इमारतीत ही शाखा सुरु झाली असून त्यांनी बांधकामच बँकेच्या दृष्टीने करुन ठेवले होते.कुठलीही बँक येणार म्हटल्यावर त्यांना ज्या सोयी हव्या असतात त्या त्यांनी आधीच बांधकाम करतांना नियोजित करुन ठेवले होते,हे विशेष.