24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home क्रीडा राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

0
202

गोंदिया दि.9 : केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाचे राष्ट्रीय युवा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत. या पुरस्काराकरीता राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवक- युवती व स्वयंसेवी संस्था यांनी आपले प्रस्ताव केंद्र शासनाकडे 26 जून 2020 पूर्वी सादर करावयाचे आहे. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक-युवती व स्वयंसेवी संस्थांनी सदर योजनेच्या अटी व शर्तीची पुर्तता करीत असल्यास आपले प्रस्ताव 26 जून 2020 पूर्वी ऑनलाईन पोर्टलवर केंद्र शासनाकडे सादर करावयाचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व बाबीचे अवलोकन करुन प्रस्ताव क्रीडा संचालनालयास सादर करावयाचे असल्यामुळे प्रस्तावाची हार्ड कॉपी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास 15 जून 2020 पर्यंत सादर करावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयास संपर्क करावे. असे जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी कळविले आहे.