
भंडारा,दि.10 : तुमसर नगरपरिषद अंतर्गत शहरातील घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराने कंत्राटी सफाई कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले होते. त्यांना पुर्वरत कामावर घेण्याचे निर्देश भंडारा सहाय्यक कामगार आयुक्त उ. सु. लोया यांनी दिले.
तुमसर नगरपरिषद अंतर्गत शहरातील घनकचरा संकलन करून त्याला डम्पिंग यार्डापर्यंत वाहतूक करण्याचे कंत्राट नागपूर येथील रामटेक तालुक्यातील शारदा महिला मंडळाला 3 वर्षांपासून दिले आहे. या कंत्राटदाराकडे 50 पेक्षा जास्त सफाई कंत्राटी कामगार कामावर असताना महाराष्ट्र कामगार कायद्यानुसार न्यूनतम वेतन राशी देण्यात येत नव्हते. कामगारांनी आपल्या हक्काची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळातील 16 सफाई कामगारांना कामावरून कमी केले.
कंत्राटदाराच्या भविष्य निर्वाह निधीची कपात होत नव्हती आणि वेतन कायद्यानुसार देत नव्हते याची तक्रार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहाय्यक कामगार आयुक्त उ. सु. लोया भंडारा यांना दिल्यानंतर शिवसेनेने पुढाकार घेऊन कमी केलेल्या सफाई कामगारांबाबत अधिकाऱ्यांच्या पाठपुरावा केला.





