28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home राजकीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना करणार वृक्षारोपण-जिल्हाप्रमुख शिवहरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना करणार वृक्षारोपण-जिल्हाप्रमुख शिवहरे

0
314

गोंदिया,दि.११ः-राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य उध्दव ठाकरे यांच्या (१३ जून) वाढदिवसानिमित्त गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघात १००१ विविध प्रजातींच्या(फळ,फुलासह कडुqनब,आंबा,बेहडा,आवळा,वड,पिपंळ,जांभुळ आदी)झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिली आहे.याकरीता शिवसेना गोंदिया जिल्ह्याच्यावतीने जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे,उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे,सुनिल पालांदुरकर,जिल्हा सघंटक सुनिल लांजेवार,,जिल्हा समन्वयक पंकज यादव,तालुकाप्रमुख टोकेश हरिणखेडे,राजेंद्र चामट,मेघराज चौधरी,युवासेना तालुकाधिकारी प्रीती कटरे,शहराधिकारी आशू मक्कड,ऋषभ मिश्रा,शहर प्रमुख गुड्डू उके,विधानसभा प्रमुख टिल्लू गुप्ता,उपजिल्हाप्रमुख अशोक अरखेल,गोलू डोहरे,शहर संघटक विनीत मोहीते,महिला आघाडी प्रमुख श्रीमती मोहीता मक्कड,सफाई कामगार आघाडी प्रमुख राजा करियार आदी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रयत्नरत आहेत.