25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय शिवसेना जिल्हाप्रमुख शिवहरे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला करणार सपत्नीक नेत्रदानाची घोषणा

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवहरे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला करणार सपत्नीक नेत्रदानाची घोषणा

0
245

गोंदिया. दि.12 (-नुकतेच १० जून ला राष्ट्रीय नेत्रदान दिन पार पडले.त्यातच शिवसेना युवा प्रमुख व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य उध्दव ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस असल्याने त्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी पत्नी टिमू मुकेश शिवहरे सह मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प जाहिर करणार आहेत.
विशेष म्हणजे यापुर्वी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी २० ऑगस्ट १९८५ ला सपत्नीक नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून वाढदिवस साजरा केला होता.blank

अंधत्व निवारणासाठी भारतात १९७६ पासून स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. अंधत्व दूर करण्यासाठी ‘दृष्टी २०२०ङ्क हे विशेष अभियान भारतात राबविण्यात येत आहे. आज जगातील अंधांची संख्या पाच कोटींच्या जवळपास असून, त्यातील जवळपास दीड कोटी भारतात आहे. यापैकी ६० लाख हे कॉर्नियामुळे (नेत्रपटल) ?अंधत्व आलेले आहेत. या अंधांपैकी जवळपास ६० टक्के बालके ही १२ वर्षांखालील आहे. भारतात दरवर्षी १ लाखांपेक्षा जास्त नेत्रपटलांची आवश्यकता असून सध्या केवळ ५० हजार नेत्रपटले नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. उपलब्ध नेत्रपटलांपैकी केवळ ६० टक्के नेत्रपटले प्रत्यारोपणासाठी वापरण्यात येते. भारतात अडीच लाख अंधांना बुबुळ प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दृष्टी देता येते.
नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजू अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी आपल्या मृत्यूनंतर दान देणे होय.नेत्रदानासाठी स्त्री-पुरुष, जाती, वंश, धर्म आणि वय हा भेद मानला जात नाही. कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीस नेत्रदान करता येते या सर्व गोष्टींचा विचार करुन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी उद्या १३ जून रोजी पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला नेत्रदान करण्याचा संकल्प करुन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.