25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांच्या बांधावर खत बियाणे वाटप

कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांच्या बांधावर खत बियाणे वाटप

0
155

आमगाव(पराग कटरे)दि.13 : सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना शेतीसाठी आवश्यक निविष्ठा थेट बांधावर वाटप करण्याचे कृषी विभागाने नियोजित केली आहे. जेणेकरून शेतकर्‍यांचा कोरोनापासून बचाव होऊन त्यांना थेट बांधावर निविष्ठा प्राप्त होतील. त्याच धर्तीवर मौजा पाऊलदौणा येथील शेतकर्‍यांना प्रत्येकी एक बॅग युरिया व एक बॅग २०:२०:००:१३ या खताचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आत्तापर्यंत १३ गटातील एकूण ३११ शेतकर्‍यांना ८९ क्विंटल बियाणे व ५१.८ खते कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोच करण्यात आले. शेतकर्‍यांना आवश्यक असणारी खते व बियाणे यांची मागणी संबंधित गट प्रमुखकाकडे शेतकर्‍यांनी नोंदविल्यानंतर तो गट प्रमुख कृषी सेवा केंद्रातून एकत्रित खरेदी करून करत असल्याने दुकानात होणारी गर्दी देखील यामुळे कमी झाली. यावर थेट कृषी विभागाचे लक्ष असल्याने ज्यादा दराने होणारी विक्री थांबून शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक कृषी निविष्ठा मिळाले मिळणे सुलभ झाले आहे. असे मत उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश बावधने यांनी व्यक्त केले.
तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन गटप्रमुखामार्फत खते व बियाण्यांची उचल करावे तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा असे आवाहन सुरज जाधव तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या प्रसंगी प्रवीण मुंडे, मंडळ कृषी अधिकारी, जी.ए.चौधरी, एस.वाय.ब्राह्मणकर, कृषी पर्यवेक्षक, तुषार सूर्यवंशी, आर.डी.हिवाळे, कृषी सहाय्यक आत्माचे सुषमा शिवणकर बीटीएम व राहुल सेंगर, एटीएम व शेतकरी उपस्थित होते