43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ आता ऑनलाईन होणार नागरिकांच्या आरोग्याची निगराणी – डॉ.कादंबरी बलकवडे

आता ऑनलाईन होणार नागरिकांच्या आरोग्याची निगराणी – डॉ.कादंबरी बलकवडे

 तीन लक्ष दहा हजार कुटुंबांवर राहणार आरोग्य पर्यवेक्षकांची देखरेख जिल्ह्यातील 13 लक्ष 76 हजार नागरिकांपर्यंत पोहोचणार अंदाजे तीन हजार शंभर कर्मचाऱ्यांची गाव पातळी, तालुका पातळी आणि जिल्हा पातळी असा त्रिस्तरीय चमू

0
279

blank

गोंदिया दि.14 (जिमाका) : देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्हयात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गरोदर महिला व स्तनदा माता, सारी आजार, ताप, किंवा इतर प्रकारच्या आजारामुळे जिल्ह्यातील नागरिकांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद येथील सभागृहात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन नागरिकांची आरोग्याबाबत माहिती कशी भरायची आहे, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उप मुख्य कार्यपालन अधिकारी नरेश भांडारकर व संजय गणवीर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.नितीन कापसे,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे म्हणाल्या की, जिल्हयातील 3 लक्ष 10 हजार कुटूंबियांपर्यंत घरोघरी पोहोचण्यासाठी गावपातळीवरील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा अंदाजे तीन हजार शंभर कर्मचाऱ्यांची चमु तयार करण्यात येत आहे. या चमुच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. जेणेकरुन जिल्हयातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे नागरिकांसाठी व आरोग्य यंत्रणेसाठी सुकर होणार आहे.

जिल्हयात एकुण 13 लक्ष 76 हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर तयारी करण्यात येत असल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या की, सर्वेक्षणामध्ये ज्या नागरिकांना काही आजाराची लक्षणे, ताप असल्यास त्याची माहिती पर्यवेक्षकांच्या व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील चमुद्वारे त्वरित जिल्हा प्रशासनास उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे पूर्वी ऑफलाईन होणारा सर्व्हे आता ऑनलाईन केला जाणार असल्याने नागरिकांना लवकरात लवकर आयोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमात गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.वेदप्रकाश चौरागडे, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय पाटील, आमगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुमेश पटले, गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किर्ती कुमार, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गगन गुप्ता, सडक/अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षवर्धन मेश्राम, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललीत कुकडे आणि अर्जुनी/मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत  तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

blank