कोरची,दि.१६: सशस्त्र नक्षल्यांनी काल (दि.१५) दुपारी ४ वाजताच्या सुमारास कोटगूल-गोडरी-नाडेकल रस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टर व एका टिप्परची जाळपोळ केली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.कोरची येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आरआरपी-२ योजनेंतर्गत कोटगूल-गोडरी-नाडेकल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. २९ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या कामाची अंदाजपत्रकीय किंमत २४ कोटी रुपये असून, चंद्रपूर येथील लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनी हे काम करीत आहे. काम सुरु असताना काल दुपारी सशस्त्र नक्षल्यांनी २ ट्रॅक्टर व एका टिप्परची जाळपोळ केली.





