
आचारात हवी शुचिता
वाणीत हवी मधुरता
वृत्तीत हवी सात्विकता
मनात हवी कृतज्ञता
उच्चारात हवी विनम्रता
कृतीत हवी क्षमाशीलता.
सर्व आयुष्य तील विद्यार्थी काळ हा अतिशय आनंदाचा व सुखाचा मानला जातो. मनुष्य मोठा झाल्यावर संसारातील अनेक आपत्ती नी व अडचणी नी त्रासून जातो; तेव्हा त्या ला आपली विद्यार्थी दशा आठवते व त्यावेळी
आपण कितीतरी पटीने सुखी व आनंदी होतो असे त्याला वाटते.याचे कारण इतकेच की त्या काळात म्हणजे च विद्यार्थी जीवनात आपल्याला कोणतीही
सांसारिक जबाबदाऱ्या नसतात; परंतु जीवन हिताच्या दृष्टीने एकंदर पाहता ही अवस्था अत्यंत महत्वाची आहे.या विद्यार्थी काळात जे संस्कार व ज्या सवयी लागतात त्या जन्मभर मनुष्याच्या अंगी दढपणे राहतात. म्हणून हा काळ केवळ आनंदाचा न वाटता जीवनाला आवश्यक असे उच्च शिक्षण प्राप्त करण्याचा आणि उच्च संस्कार व चांगल्या सवयी लावून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.
आज जर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळाले; चांगले शिक्षण मिळाले व त्या अनुरूप संकल्प पुढेही राहीले तर संपुर्ण जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. चांगले विद्यार्थी बनण्यासाठी श्रेष्ठ पुरूषांच्या चरित्रापासून बोध घेतला पाहिजे. विद्यार्थी दशा ही जीवनाची फारच महत्वाची दशा आहे.इतिहासकालीन दिक्षा परंपरेमुळे सुसंस्कारित पिढी घडविली जात होती. विद्यार्थी ची इच्छा जर प्रबळ असेल तर परमात्मा मार्गदर्शक होईल. विद्यार्थी नी आळस व कंटाळा दूर सारला पाहिजे. वाईट संस्कार चे परिणाम पुढे भोगावे लागते म्हणून संत सज्जन यांनी ज्या गोष्टी ना महत्व दिले आहे. त्याचाच विद्यार्थ्यांनी अंगीकार केला पाहीजे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. वाईट गोष्टी चा त्याग करावा.
विद्यार्थी नी आपली वाचा नेहमी पवित्र ठेवायला पाहिजे. जीवनाला आवश्यक लागणारे गुण बालवयापासून च अभ्यासले पाहिजेत. गुणदोषाविषयी साजकता बाळगली पाहिजे.कधीही अहंकार करू नये.
आजच्या केवळ पुस्तकी शिक्षणाने सज्जन ता येणार नाही.
तर सावधपणे ; चिकाटीने एक एक सद्गुण विद्यार्थ्यां नी वाढविला पाहिजे. जग सुखी करणे हा उदात्त हेतू विद्यार्थी ने ठेवला पाहिजे.यातच मानवता आहे.अशी श्रध्दा ठेवून जर विद्यार्थी ने कार्य केले की जीवनातील सर्व सिध्दी विद्यार्थी स अनूकूल होतील व त्यांचे जीवन सफल होईल व एक आदर्श नागरिक बनेल.





