
गोंदिया,दि.22ःलद्दाख सीमेवर शहीद झालेल्या शहिद जवानांना श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेनाच्या वतीने र्शध्दांजली वाहण्यात आली. स्थानिक रेलटोली येथील महाराणा प्रताप उद्यानात आयोजित छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे सिनेअभिनेता सुशांत राजपूत यांना र्शध्दांजली वाहण्यात आली.
राष्ट्रीय राजपूत करनी सेनेच्या वतीने लद्दाख येथील गलवान येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय लष्करातील २0 जवान शहिद झाले. दरम्यान या घटनेचे पडसाद देशभर उमटले असून चीन या देशातील सरकारचा निषेध करण्यात येत आहे. चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करून भारतीय वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भविष्यात चिन येथे निर्मित वस्तू घेणार नाही, असा संकल्प घेण्यात आला.
त्याचप्रमाणे सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपुत यांनाही र्शध्दांजली वाहून सिनेअभिनेता सलमान खान, एकता कपूर, करण जौहर व भंसाली यांचे पोस्टन जाळून निषेध करण्यात आला. यावेळी करनी सेनाचे अभिषेक सिंह बैस, पियुष बैस, बबलू ठाकुर, अमितसिंह चौहान, विनय बैस, राजेन्द्र सिंह राजकुमार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




