26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.देवानंद कामडी, सचिव प्रा.खुशाल कापगते

समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.देवानंद कामडी, सचिव प्रा.खुशाल कापगते

0
153

गडचिरोली,दि.22: येथे नव्यानेच गठित करण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा.देवानंद कामडी,तर सचिवपदी प्रा.खुशाल कापगते यांची निवड करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात समाजशास्त्र विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे विविध प्रश्न सोडविणे, विद्यार्थ्यांमध्ये समाजशास्त्र विषयाची आवड निर्माण करणे, अध्ययन-अध्यापन, तसेच संशोधन गतिमान करणे, समकालीन प्रश्नांची सोडवणूक करणे, दरवर्षी अधिवेशन आयोजित करणे इत्यादी विषयांवर समाजशास्त्र परिषद काम करणार आहे.

या परिषदेच्या कार्यकारिणीत अध्यक्ष-प्रा.देवानंद कामडी, सचिव-प्रा.खुशाल कापगते, कार्याध्यक्ष-प्रा.प्रकाश बांडे, उपाध्यक्ष प्रा.हेमलता चौधरी, सहसचिव प्रा.अरुण बुरे, कोषाध्यक्ष प्रा.अरुण धाबेकर, महिला प्रतिनिधी प्रा.सारिका साळवे, सदस्य सर्वश्री प्रा.शिवदास वाढणकर, प्रा.जालेंद्र सोरते, प्रा.खुशाल पवार, प्रा.श्रीनिवास भट्टलवार, प्रा.तानाजी धोंगडे,प्रा.आनंद निखाडे व प्रा.सुभाष लंजे यांचा समावेश आहे.नागपूर विभागीय समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.फुलझेले, प्रा.चंदनखेडे, प्रा.नाकतोडे यांनी जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.