भंडारा,दि.22ः- भंडारा शहराशेजारी असलेल्या गोसे खुर्द धरणाचा पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून संरक्षण भिंतीवरील रिंग रोडचे प्रस्तावित काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते. त्या कामाला खा. सुनिल मेंढे यांनी सिंचन भवनात, कार्यकारी संचालक, विदर्भ इरीगेशन डेव्ह. कॉर्पा. यांची (दि.१९)भेट घेत कामास गती मिळवून दिली. त्यानुसार सां.बा. विभाग भंडारा व (व्हीआयडीसी) यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण होणार असून त्यासाठी जून २०२० अखेरीस आवश्यक निधी सार्वजानिक बांधकाम विभागाला देण्यात येईल, अशी माहिती व्हीआयडीसी चे कार्यकारी संचालक जे. एम. शेख यांनी दिली. आपल्या भागाचा विकास व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी ह्यासाठी खा. मेंढे यांनी इंदिरा सागर जलाशय (गोसे डॅम) येथील पर्यटन विकासासाठीच्या आपल्या कल्पना कार्यकारी संचालकांच्या समोर मांडल्या.
गोसे डॅम येथे सर्व सुविधा युक्त पर्यटन स्थळ व्हावे व तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्यासाठी पर्यटनासाठीच्या संसदीयसमितीचा सदस्य ह्या नात्याने खा. मेंढे यांनी सदर पर्यटन स्थळासाठी निधी कमी पडू देणार नाही व त्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करण्याचा विश्वास खा. मेंढे यांनी दिला. सिंचन भवनात झालेल्या आजच्या बैठकीत गोसे व शेळी उपसा सिंचन योजनेच्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पवनी उपसा सिंचन योजनेच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे पवनी भागातही सिंचनाची सोय होणार असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले. चौरास पट्टयात भूमिगत नदीपात्र आहे, त्याला होणारा भूजल पुरवठा गोसे च्या बांधकामानंतर खंडित झालेला आहे. चौरास पट्ट्याचे पुनर्भरण करण्यासाठी त्वरित योजना करण्यासंबंधीचा उपयुक्त आणि व्यवहार्य पर्याय म्हणून धरणाच्या पायथ्या जवळून सोडले जाणारे डाव्या कालव्यातील पाणी वापरले जाईल व चौरास भागाचे पुनर्भरण करण्यात येईल, त्यामुळे चौरास भागातील शेतकèयांना जुने वैभव प्राप्त होईल.
तसेच गोसेचे परीघ ४०० किमीचे आहे. साधारण ८० ते १०० मीटर रुंदीचा भाग गोसे धरणाचा काठ म्हणून व्हीआयडीसी च्या ताब्यात आहे. त्याठिकाणी बांबू किंवा तत्सम वनस्पतीची लागवड करून ते सर्व बायोमॉस, बायो इथेनॉलच्या कारखान्याकरिता कच्चा माल म्हणून वापरता येईल, अशी उपयुक्त सूचना खासदार मेंढे यांच्या सोबत झालेल्या चर्चेत व्हीआयडीसी चे कार्यकारी संचालक जे. एम. शेख यांनी केली. यामुळे काठाचे वनीकरण होऊन काठ मजबूत होतील. पेटड्ढ ोलियम पदार्थाचा पर्याय मिळेल आणि तरुणांना रोजगार मिळेल. चर्चेवेळी माजी सिंचन आयोग सदस्य डॉ. उल्हास फडके, अधीक्षक अभियंता श्री. देसाई, कार्यकारी अभियंता श्री. कारेमोरे उपस्थित होते.





