गोंदिया दि.22 (जिमाका) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात जिल्ह्यात बऱ्यापैकी यश आले आहे.पाच दिवसांपासून नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. आज 22 जून रोजी दोन कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.त्यामुळे आता जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णाची संख्या 30 पर्यत खाली आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 102 कोरोना बाधित रुग्ण आढळले.72 रुग्ण उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 30 क्रियाशील रुग्ण आहेत.आज जे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे ते तिरोडा तालुक्यातील असून ते 30 ते 35 वर्ष वयोगटातील आहे.
जिल्ह्यात आढळलेले 102 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका – 31,सडक/अर्जुनी तालुका – 10, गोरेगाव तालुका – 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका – 2, गोंदिया तालुका – 22 आणि तिरोडा तालुक्यातील 32 रुग्ण आहे.
प्रयोगशाळेत कोरोना संशयित 1908 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने पाठविण्यात आले.त्यामध्ये 102 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.91 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.72 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.विविध शाळा व संस्थांमध्ये 793 आणि घरी 1935 अशा एकूण 2728 व्यक्ती विलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.





