गडचिरोली ,दि.२३::तालुक्यातील चातगाव वन परिक्षेत्रांतर्गत येणा-या खुर्सा (नवेगाव) च्या शेजारील वाहीजवळ एका पट्टेदार वाघाचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.सदर वाघ पूर्ण वाढ झालेला असुन त्याचे वय अंदाजे 5 ते 7 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारच्या रात्री गावात वाघ ओरडत असल्याचा आवाज गावक-यांना आला. त्यामुळे काही नागरिकांनी वनविभागाला रात्रीच माहिती दिली. परंतु वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आज मंगळवारला सकाळी पोहोचले तेव्हा वाघाचा मृत्य़ू झालेला होता. सदर वाघाचा वनविभागाच्या अधिका-यांनी पंचनामा कऱुन मृतदेह चातगाव वन परिक्षेत्र कार्यालयात आणन्यात आले. प्राथमिक पंचनाम्यावरून दोन वाघांची अधिवास निश्चिती वरून झडप झाली त्यात सदर वाघाचा मृत्यु झाला असुन दुसरा वाघ जखमी झाला असण्याची दाट शक्यता वन अधिकाया्नी वर्तवत नागरीकांनी सदर वनक्षेत्रात जाऊ नये अशा सुचना दिल्ल्याचे गावक-यांकडून समजले. वाघाच्या मृत्यु संदर्भात वनविभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वनविभागाकडून उत्तऱीय तपासणीनंतर प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात येणार अाहे.





