26.7 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home महाराष्ट्र आदिवासी सेवक व संस्थांच्या पुरस्कारासाठी निवड समितीची पुनर्रचना

आदिवासी सेवक व संस्थांच्या पुरस्कारासाठी निवड समितीची पुनर्रचना

0
18

मुंबई दि. ४:: ‘आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था’ हा पुरस्कार देण्याकरिता राज्यस्तरीय निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. अदिवासी विकास मंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत.आदिवासी विकास राज्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष आहेत तर विधानसभा सदस्य प्रा. अशोक उईके, विधानसभा सदस्य संजय पुराम हे सदस्य असून आयुक्त आदिवासी विकास, नाशिक हे सदस्य सचिव असतील.