अमरावती, दि. २७ : कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे तीन वाजताच सुमारास घडली. अजमद खाँ सत्तार खॉ (२९) असे आत्महत्या करणाय्रा युवकाचे नाव आहे.
नांदगाव खंडेश्वर येथे एक व्यक्ती दिनांक २५ जून रोजी कोरोना पॉजिटीव्ह आढळला होता. सदर व्यक्तींच्या संपर्कात काही नागरिक आले होते. त्यामुळे प्रशासनाने नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय वसतिगृहात सदर व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण केले होते. या विलगीकरण कक्षात गेल्या दोन दिवसापासून १६ संशयीतांचे विलगीकरण करण्यात आले आहे. परंतु आज दिनांक शनिवारी सकाळी विलगीकरण कक्षातील इतरांना अजमद खा याने कक्षाबाहेरील खिलडकीला गळफास लावून आत्म्यहत्या केल्याचे निदेर्शनास आले. हि बाब सकाळी ७ वाजताच दरम्यान उघडकीस आली. अजमद खाँ सत्तार खॉ याने स्वतःच्या दुप्पट्याने फाशी घेतली होती. विलगीकरण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. युवकाचा मुतदेह शवविच्छदना करिता पाठविण्यात आला. तत्पुर्वी घटनेचे गांभिर्य बघता उपविभागीय महसूल अधिकारी मनिष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी एस.डी.पी.ओ पुनम पाटील, तहसिलदार प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, न.प.मुख्याधिकारी मिनाक्षी यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साहेबराव इंगळे, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव, ठाणेदार उदय सोयस्कर, सह विलगीकरण कक्षाचे प्रमोद ढवळे, एस.पी सुर्यवंशी, विकास दबडगे, अभिजीत लोखंडे आदी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय सोयीस्कर व सहकारी करीत आहे.




