28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home राजकीय रिक्त होणाऱ्या सरपंच पदांवर 6 महिन्याची मुदतवाढ द्या – आ. विनोद अग्रवाल

रिक्त होणाऱ्या सरपंच पदांवर 6 महिन्याची मुदतवाढ द्या – आ. विनोद अग्रवाल

0
188

गोंदिया,दि.27ःगोंदिया तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात अंदाजे ३९ सरपंच पद रिक्त होत असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशासकाची नियुक्ती न करता सदर सरपंच पदांना पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. कोविड – १९ चा प्रादुर्भाव गोंदिया तालुक्यात सुद्धा असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी शासकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असल्याने प्रशासक नियुक्तीची फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय अधिकाऱ्यांवर अधिकचा कामाचा भार सुद्धा येऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा मध्ये दिरंगाई होऊ शकते. येत्या काळात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसाठी ग्रामपंचायतीचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले असे विविध प्रकारच्या दाखल्याची आवश्यकता पडणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासकांची नेमणूक करणे योग्य ठरणार नाही त्यामुळे प्रशासकांची नेमणूक करण्यापेक्षा सर्व सरपंच पदाचे सहा महिन्याकरिता मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र लिहून मागणी केले आहे.