27.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ बोदलबोडी येथे 7 लक्ष रुपयाच्या व्यायाम शाळेला प्रशासकीय मंजुरी

बोदलबोडी येथे 7 लक्ष रुपयाच्या व्यायाम शाळेला प्रशासकीय मंजुरी

0
1570
 सालेकसा,दि.28ः-तालुक्यातील बोदलबोडी येथे व्यायामशाळा निर्माण व्हावी याकरीता जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे ग्रामपंचायत बोदलबोडीने सादर केलेल्या ठरावाला मंजुरी मिळाल्याने व्यायामशाळेचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने सात लाख रुपयांच्या व्यायामशाळा इमारत बांधकामाला प्रशासकिय मंजुरी दिली आहे.यासाठी यशवंत शेंडे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. त्याचबरोबर सदर निधी ग्रामपंचायतला जमा होऊन या व्यायाम शाळेचे भूमिपूजन 29 जून रोजी आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तसेच ग्रामपंचायत भवनाला सुद्धा 12 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते  ग्रामपंचायत भवन व व्यायाम शाळेचे भूमिपूजन होणार आहे. या व्यायामशाळा मुळे गावातील तरुण मुले मुली यांना एक चांगली संधी मिळणार आहे. त्यात अनेक सोयीसुविधांचा पुरवठा सुद्धा केला जाईल. या व्यायाम शाळा बांधकाम मंजुरीला यश मिळवून दिल्याबद्दल गाव स्तरावरून तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.