तिरोडा,दि.29ःयेथील एमआय़डीसीमधील अदानी पाॅवर प्रोजेक्टमध्ये कार्यरत असलेल्या एका अभियंत्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारच्या रात्री उघडकीस आली.तेलंगणा राज्यातील बाडाबाजार वाढ येथील रहिवासी असलेले वेणू कोट्या सिलिबरी हे अदानी विज प्रकल्पात अभियंते असून घटनेच्या दिवशी 27 जून रोजी तिरोडा येथे भाड्याने राहत असलेल्या नेहरुवार्ड स्थित घरातून दुपारी 2 च्या सुमारास विज प्रकल्पात नोकरीवर गेले.त्यावेळी पत्नी घऱी एकटीच होती.सायंकाळी सहाच्या सुमारास शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचे दार बंद असून लाईटही बंद असल्याचे सांगितल्यावरून त्यांनी पत्नीला फोन केला.मात्र त्यांनी फोन रिसीव्ह न केल्याने ती कदाचित झोपली असवी असे समजुन परत फोन केला नाही. रात्री नऊ वाजेदरम्यान परत दुसर्या शेजाऱ्यांनी त्यांना मोबाईल वरून त्यांचे घरचे लाईट बंद बसून दारही बंद असल्याचे सांगितल्याने रात्री 9.30 दरम्यान आपली ड्युटी करून घरी परत आले.पत्नीला आवाज देऊन दार उघडण्याचा प्रयत्न केला,मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या सहाय्याने घराचे दार तोडून आत प्रवेश केला,असता त्यांची पत्नी ओढणीने सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून येताच पोलिसांनी माहिती दिली. तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्या कशासाठी झाली असावी याचे गुढ कायम आहे.घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहे.





