27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ चार वर्षाच्या आदित्य हत्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

चार वर्षाच्या आदित्य हत्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

0
110

गडचिरोली,दि.29ः जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागांतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्प मधील अवघ्या चार वर्षाच्या आदित्य नावाच्या हत्तीचा आज मृत्यू झाल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. 10 जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने आदित्य मध्यरात्री चिखलात अडकला होता.11 जून रोजी सकाळी 8:15 वाजताच्या दरम्यान त्याला चिखलातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, चिखलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अत्यवस्थ झाल्याने व खूप थकल्यामुळे वन विभागाने त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिका-यामार्फत उपचार सुरू केले होते.गेल्या काही दिवसांंपासून खाणेपिणे सोडून दिले होते.रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र आज पहाटेच्या सुमारास 4 वर्षाच्या आदित्यने  अखेरचा श्वास घेतला.