
गोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सर्वच पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी आपला सहा महिन्याचा कार्यकाळ वाढावा यासाठी शासनाकडे मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसमंतीने पारित करुन पाठविण्याचा निर्णय घेतला.मात्र गेल्या काही महिन्यात बांधकाम विभागातील घोटाळे,दुकानगाळे घोटाळ्यासह इतरावंर सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या जिल्हापरिषद सदस्यांनी चुप्पी साधल्याने तत्कालीन सेवानिवृत्त अति.मुकाअ व बांधकाम सभापतीनी नियमबाह्य कामाला मुकसमंतीच दिल्याचे दिसून आले.सर्वसाधारण सभेत जिल्हापरिषदांचा शाळा सुरु करण्यापुर्वी निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून निधीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला.तर ज्या शाळात अद्यापह नागरिक क्वारंटाईन आहेत,त्या शाळांना सध्या सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला.कृषी केंद्रावरुन अवाढव्य किमंतीत बियाणे व खतांची विक्री होत असल्याने कारवाईची मागणी करण्यात आली.सोबतच बोगस बियाणे विक्री झाल्याचे सांगत कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे यावर चर्चा आजच्या सभेत करण्यात आली.
विशेष म्हणजे आजची सभा ही 14 जुर्ले रोजी संपत असलेल्या जिल्हा परिषदेचा कार्यकाळास मुदतवाढ मिळावी आणि त्या मुदतवाढीत पुन्हा जिल्हा परिषद सदस्यांना बांधकाम विभागासह इतर विभागाची कामे मिळावी हाच मुख्य उ्ददेश विषयावरुन बघावयास मिळाला. आपला कार्यकाळास मुदत वाढ मिळवितांना आरोप होऊ नयेत याकरीता ग्रामपंचायतींनाही मुदतवाढ देत प्रशासक नेमण्यात येऊ नये असा ठराव घेण्यात आला.विशेष म्हणजे बांधकाम विभागातील नियमबाह्य कामांवर आणि 33 टक्यापेक्षा अधिकचे नियोजन असतांनाही त्यावर विरोधी पक्ष असलेल्या पक्षानेही चुप्पी साधल्याने तर्कवितर्कंना उधाण आले आहे. सेवानिवृत्तीनंतरही गोंदियात ठाण मांडून बांधकाम व लपा विभागाच्या कामात हस्तक्षेप करुन शासकीय वाहनाचा दुरुपयोग करणार्या त्या अधिकार्यावर न झालेली चर्चा,दुकान गाळेवाटपात काही सदस्यांच्या कार्यकर्त्यांसह नातेवाईकांना दुकाने मिळाल्यामुळेच या विषयांना बाजुला सारण्यता आल्याचे बोलले जात आहे.





