24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य महिनाभरात मिळणार- विष्णू सवरा

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य महिनाभरात मिळणार- विष्णू सवरा

0
26

मुंबई दि. २० –: राज्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना महिनाभरात गणवेश व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या संदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांनी शुक्रवार दिनांक 17 जुलै 2015 रोजी उपस्थित केला होता. या राखून ठेवलेल्या प्रश्नावर आज चर्चा करण्यात आली. त्यावेळी उत्तर देताना श्री. सवरा म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्याची निविदा प्रक्रिया सध्या काही तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना वेळेवर वह्या मिळाव्या, यासाठी स्थानिक पातळीवर वह्या खरेदी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनिल तटकरे, भाई जगताप, किरण पावसकर, सदस्या शोभाताई फडणवीस आदींनी भाग घेतला.

blank