23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home क्रीडा लंका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अमित मिश्राचे पुनरागमन

लंका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अमित मिश्राचे पुनरागमन

0
27

नवी दिल्ली, दि. २३ – श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. १२ ऑगस्टपासून श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून फिरकी गोलंदाज अमित मिश्राने संघात पुनरागमन केले आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली.
श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ : विराट कोहली (क), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, हरभजन सिंग, आर.अश्विन, उमेश यादव, वरूण अॅरॉन, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा.

blank